एका चोरट्याला अटक करून त्याने चोरलेले सोने जप्त करण्यात गोकाक शहर पोलिसांना यश आले आहे.

गोकाक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांनी सीपीआय गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. पीएसआय एम. डी. घोरी यांच्या पथकाने गोकाक लक्ष्मी पडगट्टे येथील सोन्याच्या दुकानाजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी केली असता, ऑगस्ट महिन्यात कडबगट्टी रोडवरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याची कबुली आरोपीने दिली.
आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 4 हजार रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. गोकाक नगर पोलिसांच्या या कार्याबद्दल एसपी व अॅडिशनल एसपींनी कौतुक केले.


Recent Comments