Savadatti

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात लाखो भाविकांची झुंबड

Share

नवरात्र उत्सवानिमित्त सौंदत्ती तालुक्यातील उगारगोळ येथील रेणुका-यल्लम्मा मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविक देवीला तेल वाढण्यासाठी दर्शनासाठी सध्या सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानला भेट देत आहेत. काल रविवारी, भाविकांच्या गर्दीने उच्चांक मोडला. एकाच दिवशी 4 लाखांहून अधिक भाविकांनी यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले. तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लावून भाविक दर्शनासाठी उभे होते. महाराष्ट्र, गोव्यासह विविध भागातून भाविक दाखल झाले आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रेणूकादेवीच्या मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि मंदिर प्रशासकीय मंडळ शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Tags:

savadatti yellamma savadatti-renuka-yellamma-jatra-navratri