बेळगाव शहरात दसरा सणानिमित्त मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगावात दसरा सणानिमित्त, शालेय मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी एलकेजी ते बारावीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील 1500 ते 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना, BEO रवी भजंत्री म्हणाले की, दसरा महोत्सवानिमित्त बेळगावमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बेळगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांचा उत्साह बघून मला असे वाटते की आपण पुन्हा पुन्हा एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली पाहिजे. त्यामुळे असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आमदार अनिल बेनके यांचे मनापासून आभार मानतो.
कार्यक्रमाचे आयोजक आमदार अनिल बेनके म्हणाले की, दसरा उत्सवानिमित्त आम्ही सरदार हायस्कूल मैदानावर क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी आज आम्ही चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी बीईओ भजंत्री आणि त्यांच्या टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. चित्रकला स्पर्धेत 1500 ते 2000 विद्यार्थी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्रे रेखाटली. यावेळी सर्व मुले अतिशय उत्साहात होती आणि त्यांनी चित्रे काढली.
Recent Comments