कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणीजवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी आरटीओ चेकपोस्टवर आज भल्या पहाटे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी पहाटे निपाणी तालुक्यातील कोगनोळी आरटीओ चेकपोस्टवर छापा टाकला. या चेकपोस्टवर मालवाहू आणि परराज्यातील वाहनधारकांकडून पैसे उकळण्यात येत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या.
या पार्श्वभूमीवर पहाटे चार वाजता छापा टाकणाऱ्या लोकायुक्तांच्या सुमारे २५ अधिकाऱ्यांच्या पथकाने कागदपत्रांची पाहणी करत आहे. ही टीम आरटीओ चेकपोस्टवर कागदपत्रांची पडताळणी करत असून सर्व गैरप्रकारांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या अधिकाऱ्यांनी सुमारे 8-10 होमगार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Recent Comments