Agriculture

चिकोडीतील बेन्नीहळ्ळी येथे शेतकरी सभेचे आयोजन

Share

शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन शेती व्यवसायात यश मिळवावे, असे आवाहन राज्य भाजप रयत मोर्चाचे उपाध्यक्ष दुंडाप्पा भेंडवाडे यांनी केले.

चिकोडी तालुक्यातील बेन्नीहळ्ळी या गावात बसवन्नी शेतकरी उत्पादक कंपनी, रूरल डेव्हलपमेंट सोसायटी, रॅमसिड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जारी केल्या आहेत. शेतकऱ्यांनी सदर योजनांचा लाभ घेऊन शेती व्यवसायात अधिकाधिक प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सहायक कृषी संचालक मंजुनाथ जनमट्टी यांनी कृषी विभागासाठी असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अशोक शिंगाई, बसवराज नरसन्नवर, अरुणकुमार, सुनील पाटील, संतराम कुंद्रुक, नागरेड्डी, के. व्ही. आवटी आदी उपस्थित होते.

Tags:

farmers scheme farmers should utilies government scheme