चिकोडी विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या जुने येडूर या गावातील एस सी कॉलनी पासून मांजरी ब्रिज पर्यंतच्या रस्त्याच्या विकास कामांना आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते चालना देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांच्या खर्चातून जुने येडूर या गावातील एस सी कॉलनी ते मांजरी ब्रिज पर्यंतच्या रस्त्याच्या विकास कामाची सुरुवात करण्यात आली. अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून होत असलेल्या सदर रस्त्याच्या विकास कामांची पूर्तता करण्यात येत असून या कामकाजाची सुरुवात आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आली.

यासंदर्भात येडूर ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष राहुल देसाई यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की अनेक दिवसांपासून जुने येडूर येथील एससी कॉलनी पासून मांजरी ब्रिज पर्यंतच्या रस्त्याची मागणी करण्यात येत होती. सदर विकास कामाला आमदार गणेश हुकेरी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली असून येडूर गावातील सर्व रस्त्यांचे विकासकाम आमदार गणेश हुक्केरी यांच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांनी येडूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत याबद्दल माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग कोळी यांनी समाधान व्यक्त केले
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा श्रीदेवी सुनील पराळे, संजय पाटील, भीमगौडा पाटील, अजित किल्लेदार, महेश कागवाडे, कंत्राटदार शिवानंद करोशी, विश्वनाथ माने, संजय पिराजे, जयपाल बोरगावे, भोपाल बोरगावे, रमेश कांबळे, धोंडीबा कांबळे, दिनकर माळकरी, राहुल कांबळे आदींसह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments