श्रीक्षेत्र येडूर येथे १९०४ मध्ये सुरु केलेलय वीरभद्रेश्वर शिवसप्ताहला यंदा ११८ वर्षे पूर्ण होत असून यंदाच्या शिवसप्ताहाचें उदघाटन डॉ. चन्नसिद्दराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामींच्या हस्ते करण्यात आले.


व्हॉइस : चिकोडी तालुक्यातील येडूर येथील वीरभद्रेश्वर देवस्थानात नवरात्रीनिमित्त श्री वीरभद्रेश्वर शिवसप्ताह आयोजित करण्यात येतो. यंदा या सप्ताहाचे ११८ वर्ष असून या सप्ताहाची सुरुवात डॉ. चन्नसिद्दराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामींच्या हस्ते करण्यात आली. या सप्ताहाला चालना दिल्यानंतर स्वामीजी बोलताना म्हणाले, कोणताही उपक्रम ८ ते १० वर्षे सुरु राहतो. मात्र १९०४ साली येडूर येथे सुरु झालेल्या वीरभद्रेश्वर शिवसप्ताहाने ११८ वर्षे पूर्ण केली आहेत, हि अभिमानाची बाब आहे. नवरात्रीत सर्वत्र देवीची उपासना केली जाते. मात्र येडूरमध्ये देवीच्या रूपात शिवाची उपासना केली जाते हे विशेष आहे, असे स्वामीजी म्हणाले.
यावेळी बेंगळुरू येथील विभूतिपूर वीर सिंहासन संस्थान मठाचे महंतलिंग शिवाचार्य स्वामीजी बोलताना म्हणाले, आध्यत्मची गोडी वाढविणे शक्य आहे. मात्र केवळ कठीण प्रसंगी भगवंताचे स्मरण करण्याऐवजी सातत्याने देवाचे नामस्मरण करावे असे स्वामीजी म्हणाले.
यावेळी बेंगळुरू येथील वेदमूर्ती आनन्दानेश्वरी स्वामीजींचे देवीपुराण ग्रंथावर प्रवचन पार पडले. यावेळी शिरगुप्पी के एल इ पियू कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी नरवाडे यांनी श्रीशैल जगद्गुरू स्वामींचा सत्कार केला. यावेळी अंबिकानगरचे ईश्वर पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजी, नूलद संस्थांमठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, सी जी मठपती, वेदमूर्ती मल्लय्या जडे, ढवय्या अरळीकट्टीमठ, श्रीशैल शास्त्री, नरसगौड कमते, मनोहर पठाणी आदींसह शालेय विद्यार्थी, भक्त उपस्थित होते.


Recent Comments