हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवाची सुरुवात तालुका दंडाधिकारी डॉ. डी एच हुगार यांच्याहस्ते धर्म ध्वजारोहणाने करण्यात आली.


पिठाधिकारी चंद्रशेखर महास्वामी यांच्याहस्ते गोपूजन पार पडल्यानंतर बेंगळुरू येथील विभूतिपूर मठाचे महांतलिंग महास्वामींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने दसरा महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महंतलिंग स्वामी म्हणाले, उत्तर कर्नाटकातील हुक्केरी हिरेमठात दशहरा उत्सव पारंपरिक पद्धतीने, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतो. यंदा हा उत्सव साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला जात असल्याचे ते म्हणाले.


Recent Comments