Khanapur

कुकडोळी गावात प्रथमच दुर्गामाता दौड !

Share

खानापूर तालुक्यातील कुकडोळी गावामध्ये यावर्षीपासून प्रथमच श्री दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.

कुकडोळी गावातील श्री शिवरायांच्या पुतळ्याजवळ ध्वजपूजन करून श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला.

त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून फिरून श्री कलमेश्वर मंदिर येथे दौडची सांगता करण्यात आली.

गावातील तरुण-तरुणी, मुले व प्रौढ मंडळी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून भगवे फेटे बांधून व भगवे ध्वज हाती घेऊन या दौडमध्ये सहभागी झाले होते. शिस्तबद्ध संचलन करून त्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

Tags:

kukdolli Shri durgamata doud