Bailahongala

टिकटॉक-युट्युब स्टार रुक्माव्वा आजींचे निधन

Share

बैलहोंगल तालुक्यातील वक्कुंद या गावात राहणाऱ्या रुक्मव्वा गोविंदाप्पा लोकरी या टिकटॉक स्टार आजींचे वृद्धापकाळाने निधन झाले. टिकटॉक आणि युट्युब स्टार म्हणून घराघरात पोहोचून अल्पावधीतच नाव कमावणाऱ्या आजींचे सोमवारी सकाळी निधन झाले.

 

आपल्या कलाकाराने, विविध प्रकारची मिमिक्री करत टिकटॉक आणि यूट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचून मनोरंजन करणाऱ्या आणि लोकांना खळखळून हसायला लावणाऱ्या रुक्माव्वा आजींनी अखेरचा श्वास घेतला. बैलहोंगल येथील फकीर कांबळे आणि मंजुनाथ बुचडी या कलाकारांच्या विनोदी व्हिडिओमध्ये आपला ठसा उमटवत आपल्या अभिनय कौशल्याने रुक्माव्वा आजी प्रसिद्ध होत्या. उत्तर कर्नाटकाच्या विशेष शैलीतील भाषेमुळे अनेक लोक त्यांच्या कलाकारावर फिदा झाले होते… त्यांच्या असंख्य विनोदी व्हिडीओपैकी काही खास व्हिडीओ आपण पाहुयात…

 

वयाच्या ९७व्या वर्षी राहत्या घरी पहाटे ५.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रुक्माव्वा आजींच्या पश्चात चार मुले, दोन सुना, जावई, भाची, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक कलाकार आणि गावातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags:

tiktok rukmavva death