उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात कलाकारांची कमतरता नाही. आता अथणी येथे पत्रकार साहित्यीक दीपक शिंदे यांनी लिहीलेल्या गाण्याच्या अल्बमसाठी चित्रीकरणाला पूजन करून प्रारंभ करण्यात आला आहे.

पत्रकार साहित्यीक दीपक शिंदे यांनी लिहीलेल्या गाण्याला पंडित पुट्टराज गवई संगीत शाळेचे महेश आबिहाळ यांनी संगीत दिले आहे. स्वाती मुधोळ प्रमुख भूमिकेत असून मुडलगीचा रॉयल विशाल नायकाच्या प्रमुख भूमिकेत आहे. यासाठी चित्रीकरण सुरु असून, हा व्हिडीओ अल्बम दिवाळीला रिलीज होणार आहे. यासाठी अथणी शहरातील गणपती मंदिरात कॅमेरा पूजन करण्यात आले. अथणी, गोकाक आणि जमखंडी आदी ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी दोन गाणी भारती सिने क्रिएशन्सने शूट केली आहेत. लोकांच्या भरभरून कौतुकामुळे सध्या आणखी एक गाणे चित्रित केले जात असून प्रेक्षकांनी कलाप्रेमींनी अल्बम मोठ्या संख्येने अल्बम पाहून कलाकारांना प्रोत्साहित करा असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी महेश अबीहाळ, कल्लू कनाळ, महादेव कागी, रॉयल विशाल, स्वाती मुधोळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
राकेश मैगुर, इन न्यूज, अथणी


Recent Comments