Athani

शिग्गावी आंदोलन यशस्वी करण्याचे रमेशगौडा पाटील यांचे आवाहन

Share

ATHANI MEESALATI RAMESHGOUDA CM HOME GHERAW
पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देण्यासाठी अनेक दशकांचा संघर्ष सुरू आहे. मात्र सरकार केवळ आश्वासने देत आहे. याचा निषेध करण्यासाठी 20 तारखेला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार आहे, असे अथणी तालुका पंचमसाली संघटनेचे अध्यक्ष रमेशगौडा पाटील यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात पत्रकार परिषदेत बोलताना रमेशगौडा पाटील म्हणाले, पंचमसाली समाज हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, आम्ही अनेक दशकांपासून या समाजाच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीकोनातून 2-ए आरक्षणाची मागणी सरकारकडे करत आहोत. मात्र अनेक मुख्यमंत्री केवळ आश्वासने देत आले आहेत. याचा आम्ही निषेध करतो आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील शिगावी येथील निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार आहे.

अथणी तालुक्यातून पाच हजारांहून अधिक लोक शिगावी येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठी समाजाच्या लोकांना आवाहन करण्यात आले आहे. जर 2-ए आरक्षण देण्यात विलंब लावल्यास नोव्हेंबर महिन्यात बेंगळुरू येथे 25 लाखांहून अधिक समाज बांधव मोठे आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने तातडीने जागे होऊन आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: