खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावात बैलगाडी शर्यत उत्साहात पार पडली. भाजप नेते अरविंद पाटील आणि विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते या शर्यतीचे उदघाटन करण्यात आले.
होय, खानापूर तालुक्यातील लकेबैल येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, पूजन व फीत कापून या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. तर माजी आमदार डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बैलगाडी हाकली.
यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले की, ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याला कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीची खूप आवड असते. या दोन्हीचे आयोजन आपल्या खानापूर तालुक्यामध्ये आवडीने केले जाते. आता पावसाळा संपत आला, दसऱ्याच्या निमित्ताने या शर्यतींचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील असे पारंपरिक खेळ, शर्यतींची परंपरा जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लक्केबैल गावातील वडीलधारी मंडळी, युवक व बैलगाडी शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments