Athani

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत भाजपतर्फे विविध कार्यक्रम : खा. अण्णासाहेब जोल्ले

Share

भाजप सेवा पंधरवड्यानिमित्त अथणीत रक्तदान, आरोग्य तपासणी, जनतेच्या मागण्या ऐकण्यासाठी सभा यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम निस्वार्थ सेवेसाठी राबविले जात असून सर्व उपक्रम यशस्वी करण्याचा आपला उद्देश आहे अशी प्रतिक्रिया चिकोडी येथील खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

भाजप सेवा पंधरवड्यानिमित्त अथणी अतिथीगृहात आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त कर्नाटक भाजपच्या वतीने देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भाजपच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक आरोग्य तपासणी, कृत्रिम पाय, पावसाच्या पाण्यासंर्भातील उपक्रम असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले उपक्रम पुढे राबविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २१११ शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान, क्रेडिट कार्ड योजना आयोजित करण्यात आली आहे. हर घर जल योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्वल योजना, किसान सन्मान, अमृत सरोवर, दीनदयाळ दिन, रक्तदान शिबीर, असे अनेक उपक्रम या सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजप युवा नेते चिदानंद सवदी, चिकोडी जिल्हा भाजप माध्यम समन्वयक मृणालिनी देशपांडे आदी उपस्थित होते.

Tags: