खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील बिडी-पारिशवाड गावांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील पुलाला भगदाड पडले आहे. त्याशिवाय या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बांधकाम मंत्री सी.सी.पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे आ. अंजली निंबाळकर त्यांनी सांगितले.


आ. डॉ.अंजली निंबाळकर यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी स्वतः या पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते उपाय करण्याची सूचना केली होती. तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. काल खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन रस्ता व पुलाची पाहणी केली. मात्र अद्याप कोणतेही काम सुरू न झाल्याने जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याबाबत सोशल मीडियावर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.


Recent Comments