Belagavi

भाजपतर्फे 17 सप्टेंबरपासून विविध उपक्रमांनी सेवा पंधरवडा : एम. बी. जिरली

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दीनदयाळ उपाध्याय आणि महात्मा गांधीजींच्या जयंती अनुषंगाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत भाजपतर्फे सेवा पंधरवडा पाळण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी दिली.

बेळगावात आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना एम. बी. जिरली म्हणाले की, मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरीब व महिलांच्या विकासाची कामे कलेची. त्यामुळे जगभरात भारताची शान वाढली आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस, 25 सप्टेंबर रोजी दीनदयाळ  उपाध्याय यांचा वाढदिवस आणि 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती असल्याने भाजपतर्फे सेवा पंधरवडा पाळण्यात येणार आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचे जीवन दर्शन, त्यांनी केलेले कार्यक्रम. रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने कोविडमध्ये संपूर्ण जगात सर्वात मोठे यश मिळवले आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर या जन्मदिनाचा एक भाग म्हणून वोकल फॉर लोकल हा कार्यक्रम आखला आहे. खेड्यांमध्ये कॅच द रेन कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी माहिती देण्यात येईल. पावसाचे पाणी संग्रहित करण्याबाबत गावात जनजागृती मोहीम, 2 ऑक्टोबर रोजी ‘खादी खरेदी करा आणि परिधान करा’ हे अभियान तसेच स्वच्छतेबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 त्या नंतर बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, लोकसहभाग वाढवण्यासाठी आम्ही खूप मोठा कार्यक्रम करत आहोत. पक्षाच्या सर्व विभागांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. रयत मोर्चाच्या वतीने ग्रामीण भागात कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक तलाव, बंधारे स्वच्छ करण्यात येणार आहेत. ओबीसी मोर्चांच्या कार्यकर्त्यांनी सीड बॉल्स तयार केले. अंगणवाडी केंद्रांमध्ये शासकीय कार्यक्रम राबविण्याकडे महिला मोर्चा लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 पत्रकार परिषदेत खासदार मंगला अंगडी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, नेते बिरादार, मल्लिकार्जुन मादमन्नावर, एफएस सिद्धनगौडर, प्रभू हुगार, संजय हंची, शरथ पाटील, नितीन चौगुले आदी उपस्थित होते.

Tags: