Belagavi

नवपदवीधरांनो स्वावलंबी भारत घडवा : आरसीयूच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचे आवाहन 

Share

नव्याने पदवीधर झालेल्या तरुणतरुणींनी एक नवीन, महान आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. भारताला यश आणि समृद्धीच्या सर्वोच्च शिखरावर नेले पाहिजे असे आवाहन महामहिम राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये पार पडलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात बीजभाषण केले. भारताची इनोव्हेशन इंडस्ट्री हे जगातील एक आकर्षक केंद्र आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे नवा भारत निर्माण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून आपण आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाला प्रगतीपथावर नेले पाहिजे. राणी चेन्नम्मा विद्यापीठ हे राज्यातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. कमी कालावधीत चांगली शैक्षणिक कामगिरी दाखवल्याबद्दल त्यांनी कुलगुरु आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. राणी चेन्नम्मा यांच्या त्याग आणि शौर्याचे स्मरण करून त्यांनी राणी चेन्नम्मा या तरुण वर्गासाठी प्रेरणादायी ठरावी असे सांगितले. बाइट:

मानद डॉक्टरेट मिळालेले कन्नड चित्रपट अभिनेते रमेश अरविंद, समाजसेवेच्या क्षेत्रात व्ही.रविचंदर, धर्मक्षेत्रात सेवा देणार्‍या आई व बहीण अन्नपूर्णा यांनाही मानद डॉक्टरेटचे वाटप करून त्यांचे अभिनंदन करून समाजाप्रती कर्तव्य बजावत राहावे, असे सांगितले. फ्लो

मानद डॉक्टरेट मिळालेले अभिनेते रमेश अरविंद म्हणाले, “सिनेमाने मला माझ्या आयुष्यात सर्वकाही दिले आहे. मला मानद डॉक्टरेट मिळाली आहे हे कळल्यावर माझ्या कुटुंबाला आनंद होईल आणि मी यावेळी माझ्या वडिलांची आठवण करून भावूक झालो. यावेळी त्यांनी सिनेक्षेत्रातील यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे स्मरण करून विश्व विद्यालयाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. बाइट:

राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.रामचंद्र गौडा यांनी दीक्षांत समारंभात 48 पीएच.डी. 2434 मास्टर्स; 40,034 पदव्या, 13 पीजी डिप्लोमा आणि 80 प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रमाणपत्रे दिली जातील, असे सांगितले.

या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या, विविध विषयांचा अभ्यास केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ४८ पीएच.डी पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळालेल्या 6 पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना एकूण 11 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

बॅचलर ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी विद्यावती गुडोदगी, बॅचलर ऑफ सायन्सची विद्यार्थिनी दीपिका चव्हाण, कन्नडची विद्यार्थिनी द्राक्षायणी वाल्मिकी, मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशिओलॉजीचा विद्यार्थि तात्यासाब धाबडे, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची विद्यार्थिनी गौरा अनप्पनवरा, मास्टर ऑफ सायन्सची विद्यार्थिनी अनुजा पाटील, गणिताची विद्यार्थिनी अनुजा पाटील यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.

विषयनिहाय सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या रसिका मलाई (इंग्रजी), संजीवनी पाटील (कन्नड), वर्षा मर्डी (समाजशास्त्र), प्रेरणा पन्हाळकर (वाणिज्य) यांनी अनुक्रमे सुवर्णपदके पटकावली. दरम्यान, 163 विद्यार्थ्यांना रँक प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे मूल्यमापन कुलसचिव प्रा. शिवानंद गोरनाळे, कुलसचिव प्रा. एम. हनुमंतप्पा, वित्त अधिकारी प्रा. डी.एन. पाटील, विद्यापीठ सिंडिकेट आणि शैक्षणिक दीक्षांत समारंभात परिषदेचे सदस्य, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

Tags: