बेळगाव जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कागवाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई माहिती दिलेल्या २४ तासाच्या आत देण्यात येईल, अशी माहिती चिकोडी जिल्हा कृषी विभागाचे सहसंचालक एल वाय रूडगी यांनी दिली.

मंगळवारी कागवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश बुरली हे होते. तालुकास्तरीय विशेष अधिकाऱ्यांच्या या बैठकीत तालुका नोडल अधिकारी एल वाय रूडगी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने विशेष बैठक घेण्यात आली असून या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, तसेच पशुधनासंदर्भात काही अडचणी असल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही जीवितहानीसंदर्भातील माहिती असल्यास याची माहिती तातडीने जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास तत्पर रहावे अशा सूचना रूडगी यांनी दिल्या. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसू १२ घरांचे नुकसान झाले असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी तहसीलदार राजेश बुरली बोलताना म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांनी निरंतर सेवा बजावावी. कोणीही रजेवर जाऊ नये, रजेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असून अतिवृष्टीसंदर्भातील समस्या सोडविणे हि अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. ()
या बैठकीला तालुका सीडीपीओ संजीव कुमार, बीईओ एम आर मुंजे, तालुका वैद्याधिकारी डॉक्टर पुष्पलता सुन्नदकल, कृषी अधिकारी कांतिनाथ बिरादार आदींसह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments