बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील दर्ग्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून सामाजिक सलोख्याची परंपरा जपण्यात आली आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील अलकट्टी कंठी गल्ली येथील फक्कीरस्वामी दर्ग्यात विघ्नहर्ता गणराय विराजमान झाले आहेत. येथे हिंदू-मुस्लिमांकडून विघ्ननिवारकाची नित्य उपासना सुरू आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थानिकांकडून मोहरम आणि चतुर्थी दरवर्षी साजरी केली जात आहे.
रोज गणपतीला हार घातला जातो, आरती केली जाते. दोन्ही धर्मीय लोक पूजा करतात, भक्तिभावाने मंत्रोच्चार करतात. यातून हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मांच्या नागरिकांकडून श्रीगणेशाचा नामजप करून सामाजिक सलोख्याचे संदेश दिला जातोय.
एकीकडे राज्यात आणि देशात जातीय सलोखा धोक्यात आणणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. अशा वेळी बैलहोंगल नगरीत हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करून भारत धर्मनिरपेक्ष राज्य असल्याचा संदेश संपूर्ण देशाला दिला जातोय ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.


Recent Comments