अथणी येथे काल पोलिस खात्यातर्फे गणेशोत्सवानिमित्त गणेआयचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक ढोल–ताशा अशी वाद्ये वाजवत उत्साहात मिरवणुकीने गणरायाचे स्वागत करण्यात आले.

होय, कायदा व सुव्यवस्था राखण्यावर नेहमीच भर देणाऱ्या पोलिसांकडून काल, बुधवारी अथणी पोलीस स्थानकात गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यासाठी जीपवर श्रीमूर्ती ठेवून ती मिरवणुकीने वाजतगाजत पोलीस स्थानकात आणण्यात आली. यावेळी डीजे किंवा डॉल्बीला फाटा देऊन ढोल-ताशांच्या गजरात श्रीमूर्ती आणण्यात आली.
पोलीस विभागाने साध्या पारंपरिक वाद्यांसह गणरायाचे स्वागत केले. पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान, स्वतः वाद्ये वाजवून मिरवणुकीचा आनंद लुटला.


Recent Comments