चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात बसवेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त निकाली जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या दोन वर्षात कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इंगळी येथील बसवेश्वर यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यंदा या यात्रा महोत्सवाचा भाग म्हणून निकाली जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणासह देशातील विविध भागातील नामवंत कुस्तीगीर सहभागी झाले होते.
आमदार गणेश हुक्केरी, बसवप्रसाद जोल्ले आदींसह अनेक मान्यवरांनीही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. यंदाच्या सामान्यांसाठी बसवप्रसाद जोल्ले यांनी १० हजार रुपये, आमदार गणेश हुक्केरी यांनी २५ हजार तसेच पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे माजी ग्राम पंचायत सदस्य संजय कुडची, विशाल कुडची यांनीही या स्पर्धेसाठी ३० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच पुढील वर्षी या स्पर्धांसाठी १ लाख रुपयांची देणगी देण्यात येईल, असे आश्वासनही दिले.
या कुस्ती स्पर्धांचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी दाखल झाले होते. दावणगेरे येथील कार्तिक काटे, पंजाबमधील भोला या कुस्तीपटूनि बाजी मारली. विजेत्या कुस्तीपटूंना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कुस्ती कमिटीच्या सदस्यांनी कुस्तीसाठी सढळ हस्ते देणगी दिलेल्या देणगीदारांचे आभार मानले.
यावेळी वसंत जोशी, आनंदा जाधव, शंकर पुजारी, संजय कुडची, गणपती धनवडे, रामा ऐहोळे, शशिकांत धनवडे, भूपाल पानझडे, मारुती मगदुम्म, बाळू आवटी, महादेव जाधव, कुशाप्पा आंबी, नंदू घाटगे आदी उपस्थित होते.


Recent Comments