Hukkeri

…तर “नोटा” मतदान स्वीकारावे लागेल : बसवजय मृत्यूंजय महास्वामीजी

Share

बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी 2023 च्या निवडणुकीत नोटा मतदान स्वीकारण्यासाठी सज्ज रहावे असा इशारा कुडल संगमचे बसवजय मृत्यूंजय महास्वामीजींनी दिला.


लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण मिळण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या तसेच विधानसौधला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जागृती जथा काढण्यात येत आहे. आज हुक्केरीतील आडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात बसवण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वामीजींनी तालुकास्तरीय जथ्याला चालना दिली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बसवजय मृत्यूंजय स्वामीजी म्हणाले, पंचमसाली समाजाला २-ए प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या 1 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करून विधानसौधला टाळे ठोकण्यात येणार आहे. २०२२च्या आत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठवला पाहिजे. अन्यथा त्याचे पडसाद येत्या विधानसभा निवडणुकीत उमटतील. निवडणुकीत नोटा मतांसाठी या लोकप्रतिनिधींनी तयार रहावे असा इशारा स्वामीजींनी दिला.

यावेळी तालुका पंचमसाली समाजाचे अध्यक्ष गुंडू पाटील, गौरवाध्यक्ष विजय रवदी, माजी मंत्री शशिकांत नाईक, बसवराज पाटील, चंदु गंगन्नावर, वृषभ पाटील, बसनगौडा पाटील, विनय पाटील, गविश रवदी, सुभाष नाईक, भीमाप्पा चौगला, तम्मण्णा पाटील, मगदूम तसेच हुक्केरी तालुक्यातील विविध गावातील पंचमसाली समाजाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: