गेल्या अनेक वर्षांपासून लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या खिळेगाव बसवेश्वर सिंचन प्रकल्पाला येत्या १२ डिसेम्बर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चालना देण्यात येईल, असे आश्वासन पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे यांनी दिले.

कर्नाटक पाटबंधारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन गुंगे यांनीही ऐनापुरे येथे पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. (फ्लो)
खिळेगाव बसवेश्वर पाटबंधारे सिंचन प्रकल्पात गतवर्षी फारसा फरक पडला नसला तरी याचे काम मात्र वेगाने सुरु आहे. या कामकाजात गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे उपाध्यक्ष जी व्यंकटेश्वर यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे, या कामकाजाच्या प्रगतीसंदर्भात सायंकाळी दूरध्वनीच्या माध्यमातून कॉन्फरन्स घेण्यात येणार असून यावेळी माहिती घेण्यात येणार आहे, अशी ग्वाहीदेखील आमदार श्रीमंत पाटील यांच्यासमोर संचालकांनी दिली.
याचप्रमाणे कागवाड चे आमदार श्रीमंत पाटील यांनी बोलताना सांगितले कि, या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले असून त्यांच्याच आदेशावरून व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुनगुंगे यांनी आज या कामकाजाची पाहणी करून सर्व कामाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे कामकाज सुरळीत पार पडले, शिवाय १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत या सिंचन प्रकल्पाला चालना मिळेल, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.
यावेळी गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे जे वेंकटेश्वर, अधिकारी के राजेश, बी राठोड, एस एस श्रीनिवास, के रवी, रवींद्र नक्की, आकिष देवधर, प्रवीण हुनसिकट्टी, प्रशांत पोतदार, बसवराज गलगली, के एम एफ संचालक अप्पासाहेब अवताडे, दादा पाटील, राजेंद्र पोतदार आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments