चिकोडी तालुक्यातील शिरगाव येथे बसवेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गेल्या २ वर्षांपासून कोविड कारणामुळे रद्द झालेली शिरगाव येथील बसवेश्वर यात्रा भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरी झाली.

यात्रेच्या निमित्ताने बसवेश्वर देवाला महारुद्राभिषेक, पूजा, आरती, नैवेद्य यासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिरगाव येथील बसवेश्वर देवस्थानात कर्नाटकासह महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे हि यात्रा आयोजिण्यात आली नव्हती मात्र यंदा भव्य प्रमाणात हि यात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यात्रा कमिटी सदस्यांनी दिली.
नीलम्मा देवी, लक्ष्मी देवी पालखीचेही या यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. याचप्रमाणे कुस्ती, कब्बड्डी, सायकल स्पर्धा, बैलगाडी – घोडागाडी शर्यती यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

शेवटच्या श्रावण सोमवारी सुरु झालेली हि यात्रा ३ दिवस सुरु होती. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला होता. कोविडनंतर दोन वर्षांनी हजारो भक्तांच्या उपस्थितीत चिकोडी – शिरगाव येथील श्री बसवेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


Recent Comments