Khanapur

उंदरीसाठी नंदगडच्या बकरी बाजारात मोठी उलाढाल

Share

खानापूर तालुक्यातील नंदगडचा साप्ताहिक बाजार आज बुधवारी झाला. यावेळी एपीएमसी आवारातील बकरी बाजारात मोठी उलाढाल झाली.

सध्या श्रावण महिना असल्याने मांसाहारावर अघोषित बंदी आहे. मात्र श्रावण संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उंदरीचा खास बेत खानापूर तालुक्यात अनेक गावात आखण्यात आला आहे.

त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी एक आठवडा आधीच मेंढ्यांची खरेदी उरकल्याचे दिसून आले. उंदरी बनवून बकऱ्यांचा बळी देऊन पाहुण्यांना मोठी मेजवानी देण्याची परंपरा या तालुक्यात आहे. आणखी आठवड्याभरात गणेशोत्सव सुरु होईल.

पण त्यात उंदरीचा हा दिवस खास असतो. या पार्श्वभूमीवर नंदगड एपीएमसीच्या आवारात आज, बुधवारी झालेल्या साप्ताहिक बाजाराबरोबरच बकरी मंडईत नंदगड परिसरातील गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून बकरी खरेदीवर भर दिला. यावेळी बकरी मंडईत लाखो रुपयांची उलाढाल झाली.

Tags: