Athani

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनावरील हल्ल्याचा निषेध

Share

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर अंडी फेकण्यात आलेल्या प्रकारच्या निषेधार्थ आज अथणी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत झालेल्या प्रकाराला भाजप आणि आर एस एस ला दोषी धरत आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात बोलताना एस के बुटाळी बोलताना म्हणाले, सिध्दरामय्यांच्या वाहनावर अंडी फेकण्यात भाजप आणि आर एस एस कार्यकर्त्यांचा हात आहे. कोडगु येथे एका लग्नसमारंभात आमदारांनी गळ्यात पट्टे घालून काँग्रेस पक्षाचे सदस्य असल्याचे भासविण्यात आले.

२६ तारखेला कोडगू येथे एस पी कार्यालयाला घेराव घालून जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला लाखो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवाय सिद्धरामय्या समर्थक देखील या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हि बाब लक्षात घेऊन भाजप हताश होत असून यामुळे सिध्दरामय्यांची ताकद वाढेल, असे ते म्हणाले.

यावेळी रवी बदकंबी, सचिन बुटाळी, चिदानंद मुकूनी, इसाक नदाफ, होळप्पा पुजारे, नेमिनाथ नंदेश्वर, गजानन गलबी, बाळू मुजावर, सिद्दू कोकटनूर, बिराप्पा पुजारी, बसवराज सरगर, बंदेनवाज मुजावर, मांतेश हिरेमठ, वरदकुमार बाडगी आदींसह इतर उपस्थित होते.

Tags: