भारतीय लष्करात सेवा बजाविलेले आणि त्यानंतर शालेय वाहनावर चालक म्हणून सेवा वाजविणारे रघुनाथ अवताडे यांचा बनजवाड अपघातात मृत्यू झाला असून त्यांनी स्वतःचे प्राण गमावून बसमधील इतर विद्यार्थ्यांचा जीव वाचविला आहे. सदर अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची कागवाड येथील आमदार श्रीमंत पाटील यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या रघुनाथ अवताडे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले असून जखमी विद्यार्थ्यांना धीर देण्याचेही काम केले आहे. काही विद्यार्थी कोल्हापूर आणि बेळगाव मधील रुग्णालयात उपचार घेत असून उद्या सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी उपलब्ध झाली आहे.
यावेळी आमदारांनी जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. महेश कापसे आणि यशस्वी रुग्णालयाला भेट देऊन त्यानंतर तालुक्यातील रघुनाथ अवताडे कुटुंबीयांचीही भेट घेतली. ()
यावेळी श्रीमंत पाटील यांच्यासमवेत तहसीलदार सुरेश मुंजे, सीपीआय रवींद्र नायकोडी, समाज कल्याण अधिकारी प्रवीण पाटील, नानासाहेब अवताडे, बापूसाहेब जाधव, मल्लिकार्जुन अंदाणी, शिवानंद संक्रट्टी, संजीव जाधव, बनजवाड संस्थेचे लक्ष्मण बनजवाड, अनिता बनजवाड, डॉ. महेश कापसे, डॉ. आनंद कुलकर्णी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments