महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आता पाऊस कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. त्याशिवाय 3 निम्नस्तरीय पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती.
त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील सखल भागातील नदीवरील पूल जलमय झाले होते. मात्र सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने चिक्कोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. परिणामी मलिकवाड-दत्तवाड, सदलगा-बोरगाव, एकसंबा-दानवाड हे ३ पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे पुराची भीती असलेल्या नदीकाठच्या लोकांनी पाणी ओसरल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


Recent Comments