चांगल्या पावसामुळे तुडुंब भरलेल्या निपाणीतील जवाहर तलावात आज जोल्ले दाम्पत्याच्या नेतृत्वाखाली गंगापूजन करण्यात आले.

यावेळी गंगा मातेचे विशेष पूजन करून तलावाला ओटी अर्पण केल्यावर बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, नैसर्गिक जलस्रोत असलेला तलाव चांगल्या पावसामुळे भरला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने वाहून येणाऱ्या झऱ्यांनी जवाहर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मुबलक पाण्यामुळे नागरिकांनाही आनंद झाला आहे. त्यामुळे तलावात आज गंगापूजन केल्याचे सांगून आनंद व्यक्त केला.

यावेळी चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, निपाणी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राज गुंदेशा, नगरपरिषद सदस्य संतोष सावगावकर, दीपक पाटील, आशा टवळे, सोनल कोटाडिया, दत्ता जोत्रे, सद्दाम नागरजी, सोनल उपाध्याय, रवि कदम, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, तसेच भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या, जैन इरिगेशन कंपनीचे आणि पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments