Khanapur

मराठीत कागदपत्रे द्या; अन्यथा साराबंदी आंदोलन; म. ए. समितीचा इशारा

Share

खानापूर तालुक्यातील हलशी ग्राम पंचायत हद्दीतील चारही गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून सर्व प्रकारची माहिती आणि कागदपत्रे मराठीतून द्यावीत, अन्यथा येणाऱ्या काळात पंचायतीला जाब विचारला जाईल अशा इशाऱ्याचे निवेदन गुरूवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हलशी ग्राम पंचायतींना बुधवारी दिले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना मराठी कागदपत्रांसाठी निवेदन दिली जात आहेत. हलशी ग्राम पंचायतीतर्फे कन्नड भाषेतून सरकारी कागदपत्रे व माहिती दिली जात असल्यामुळे गावातील नागरिक व मराठी भाषिक सदस्यांची अडचण निर्माण होत आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. तसेच हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, भांबर्डा गावांमध्ये 90 टक्के पेक्षा अधिक मराठी भाषिक आहेत.

त्यामुळे केंद्र व कर्नाटक सरकारच्या भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार व न्यायालयाच्या आदेशानुसार पंचायतीकडून दिली जाणारी सर्व कागदपत्रे, परिपत्रके, नोटीस, कर पावती कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतून देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पंचायतीने कन्नड बरोबर मराठीतून कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा आमची मागणी वेळेत पूर्ण न केल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मराठी भाषिक कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचे साराबंदी आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला

. ग्राम विकास अधिकारी आर. जे. रेड्डर यांनी निवेदनाचा स्वीकार केला. फ्लो यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई, हलशी पिकेपीएसचे अध्यक्ष सुधीर देसाई, माजी ग्राम पंचायत सदस्य पांडुरंग फोंडेकर, गजानन देसाई, अनंत देसाई, राजकुमार देसाई, वामन देसाई, बंडू देसाई, विनोद देसाई, सुनिल देसाई, मल्लाप्पा देसाई, पुंडलिक देसाई, प्रशांत देसाई, बबन देसाई यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

MES MEMO HALASI