हुक्केरी तालुक्यातील शिरगाव येथील प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक सिद्दप्पा बसप्पा तेरणी यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.
शिरगाव येथील प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आणि डॉ. प्रकाश तेरणी यांचे वडील सिद्दप्पा बसप्पा तेरणी यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा देह बैलहोंगलच्या डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत हुबळीतील केएलई संस्थेच्या श्री जगद्गुरु गंगाधर महास्वामी मुरुसावीर मठ मेडिकल कॉलेज दान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव आणि केएलई बीएमके आयुर्वेद महाविद्यालय बेळगावचे मुख्य प्राध्यापक डॉ. महांतेश रामण्णावर यांनी देहदानाबद्दल जागृती करून तेरणी कुटुंबीयांचे आभार मानले.
सिद्दप्पा तेरणी यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.



Recent Comments