पूरग्रस्त भागातील नागरिकांची दळण-वळणाची सोय उत्तम व्हावी, यासाठी सर्वप्रथम पूरग्रस्त भागातील रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली.

चिकोडी तालुक्यातील इंगळी या गावात रस्ते विकासकामाला प्रारंभ केल्यानंतर आमदार गणेश हुक्केरी बोलत होते. आज शिरगुप्पी मार्ग ते धनवडे शेतमार्गापर्यंतच्या रस्त्याचे २.५० लाख रुपयांच्या निधीतून तसेच शिवाजी चौक ते एस सी कॉलनी येथील हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे २ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकाम करण्यात येत आहे. या विकासकामाला आज आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते चालना देण्यात आली. यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी यांनी सांगितले कि, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या दळणवळणासाठी सर्वप्रथम या भागातील रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कुडची बोलताना म्हणाले, पूर परिस्थितीदरम्यान येथील नागरिकांना दळणवळणासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. जनावरांना घेऊन जाताना अनेक समस्या निर्माण होतात. आज आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या विकासकामांची सुरुवात होत आहे. आमदारांच्या प्रयत्नातून होत असलेल्या या रस्त्याच्या कामकाजाबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले.

यावेळी राम ऐहोळे, उपाध्यक्ष शशी धनवडे, शिवाजी पवार, चंद्रकांत लंगोटे, रमेश मरचटे, संजू कुडची, अण्णासाहेब सरडे, शिवानंद चौगुले, अजय माने, बसवराज चौगुला, होवअण्णा चौगुले, शंकर सुंगारे, कुशाप्पा आंबी, अकबर नदाफ, संतू पणदे, गजेंद्र मगदूम, बाबू मिर्जी, अण्णासाहेब ढाबडे, तुकाराम ऐहोळे, बापू भरमे, विश्वनाथ हुचट्टी, बसाप्पा मिर्जी, गणपा माने, कंत्राटदार रवी माळी, चंद्रशेखर जोनि आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments