Athani

अथणी येथे मरुळशंकर जन्मदिनानिमित्त कार्यक्रम

Share

अथणी बुधवारी सायंकाळी श्रीमती काशीबाई चिक्कट्टी इंग्रजी माध्यम शाळेत श्री मरुळशंकर देव फाउंडेशनच्या वतीने श्री मरुळ शंकर देव जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासह अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विविध उपक्रम देखील हाती घेण्यात आले होते.

:या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या निबंध आणि भाषण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करण्यात आले.या कार्यक्रमात श्री शिवबसव गुरु मुरुघराजेंद्र स्वामींनि उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. श्री मरुळ शंकर देव यांच्या अध्यात्मिक शक्तीबद्दल त्यांनी माहिती देत ते आजही भक्तांच्या हृदयात असल्याचे सांगितले. शतायुषी मरूळ शंकर देव यांच्या निधनानंतर अथणी बंद पाळण्यात आला. त्यांचा शतमानोत्सव शालेय विद्यार्थ्यांसमवेत करण्यात येत आहे हि उत्तम बाब असल्याचे ते म्हणाले. हल्लीच्या मुलांना शिक्षणासोबतच अध्यात्माचेही महत्व पटवून देणे गरजेचे असून शिक्षणाच्या अतुच्च टप्प्यात त्यांना सर्व संकल्पनांची माहिती असणेही आवश्यक असल्याचे स्वामीजी म्हणाले. याचप्रमाणे यश आणि स्वप्नपूर्तीबद्दलही स्वामीजींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

या कार्यक्रमास उपस्थित असलेले युवावा नेते चिदानंद सवदी यांनी महतपस्वी मुरुघराजेंद्र शिवयोगी आणि मौनयोगी मरूळ शंकर देव हे गच्चीनमठाच्या दोन डोळ्यांप्रमाणे असल्याचे सांगितले. श्री मरूळ शंकर देव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आपण सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शिक्षक सुरेश चिक्कट्टी, श्री मरूळ शंकर देव फाउंडेशनचे अध्यक्ष चन्नबसय्या ईटनाळमठ, ज्येष्ठ पत्रकार शिवपुत्र यादवाड, कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष रामांना धरीगौडर, करवे अध्यक्ष अन्नसाब तेलसंग, शंभू ममदापुर, मल्लिकार्जुन गंगाधर, एस के होळप्पांनावर, सुनील मनासी, सदाशिव चिक्कट्टी आदी उपस्थित होते.

Tags: