Kagawad

श्रीहरी हायस्कूलच्या 75 विद्यार्थ्यांना हवाई सफर

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील उगार शुगर वर्क्स साखर कारखान्याच्या डॉ. शिरगावकर शैक्षणिक संस्थेच्या एनएनसी आणि हायस्कूलच्या 75 विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विमानाने बेळगावहून पुण्याला जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

रविवारी उगार येथे डॉ. शिरगावकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंदन शिरगावकर आणि त्यांच्या आई राधिकाताई शिरगावकर यांनी श्रीहरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना उगारहून बेळगावला नेणाऱ्या बसचे पूजन करून या उपक्रमाला चालना दिली.

 

यावेळी बोलताना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंदन शिरगावकर म्हणाले की, देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता 75 विद्यार्थ्यांना बेळगावातील सुवर्णसौध आणि बेळगाव विमानतळ पाहण्याची तसेच बेळगावहून पुण्याला विमानाने जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विमानाची माहिती घेऊन सुवर्ण सौधची इमारत पाहून रविवारी सुटीच्या दिवशी मौजमजा करण्याची संधी दिली आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

यावेळी उगार महिला मंडळाच्या संचालिका राधिकाताई शिरगावकर म्हणाल्या की, उगारच्या श्रीहरी विद्यालयाचे विध्यार्ती नशीबवान आहेत, तुम्हाला विद्यार्थीदशेतच विमानाची आणि सुवर्णसौधची सर्व माहिती प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात येत आहे. हे ज्ञान मिळवून उगारचे विद्यार्थी म्हणून सर्वत्र नाव कमवा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

श्री हरी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. दीप्ती भोसले यांनी शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन व पालकांचे आभार मानले. यावेळी इंग्रजी माध्यम विभागाच्या प्राचार्या सौ. कल्याणी फडणीस, ए. ए. काळेबेरी, एस. डी. देशमुख, आर. एन. मठद, एस. वाय. संकोनट्टी, साखर कारखान्याचे अधिकारी अतुल नाईक, बी. एन. अकिवटे, एम. बी. जोशी, नितीन पत्की आदी उपस्थित होते.

Tags: