Bailahongala

जेडीएसतर्फे बैलहोंगलमध्ये पोलिसांचा निषेध

Share

पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून जेडीएस कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप करून याच्या विरोधात जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली बैलहोंगल येथे निदर्शने करण्यात आली.

बैलहोंगल येथे आज, शनिवारी जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली जेडीएस कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलिस हल्ल्याचा निषेध करत निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी म्हणाले, रक्षण करणारे पोलीसच जर अन्याय करत असतील तर निरपराध लोकांनी जायचे कुठे? जेडीएस कार्यकर्त्यांना खून, दरोडा आणि इतर मोठ्या प्रकरणात अडकवण्याच्या पोलिस कारवाईचा मी धिक्कार करतो. बारमालकांचे बाहुले बनलेल्या पोलिसांनी जातीवाचक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल केला ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याऐवजी जेडीएस कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. पोलिसांनी नैतिकतेचा धडा शिकवून न्यायासाठी उभे राहावे. कोणत्याही लॉबीला बळी न पडता सर्व लोकांना समान वागणूक दिली पाहिजे. त्यांनी अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

जेडीएस जिल्हा पक्ष प्रवक्ता सनगौडा संगनगौडर, जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल वेर्णेकर, तालुकाध्यक्ष एस. व्ही.पाटील, निंगाप्पा कंबळी, फकीर कडकोळ, पुंडलीका सानिकोप्प, नागप्पा सवदत्ती, बासू वन्नूर, सुनिल मेटी, आनंद काजगार, संतोष पशुपतीमठ आणि जेडीएस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: