Kittur

वीर राणी कित्तूर चन्नम्मा अभिमान्यांचा जिल्हा प्रशासनाविरोधात रोष कित्तूर परिसर संपूर्णपणे बंद!

Share

कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती बनविण्यास तीव्र विरोध दर्शवत आज कित्तूर बंद ची हाक देण्यात आली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेला बंद संपूर्णपणे यशस्वी झाला आहे.

बच्चनकेरी गावातील ५७ एकर जमीन कित्तूर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. सदर जमीन कित्तूर प्राधिकरणाला सोपविण्यात यावी, असा सरकारचा उद्देश आहे. यासंदर्भात बैलहोंगल उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रही लिहिले आहे. यावर आक्षेप घेत कित्तूर राणी चन्नम्मा अभिमान्यांनी आज कित्तूर बंदची घोषणा दिली होती. शिवाय प्रशासनानेही आक्षेप नोंदविण्याची संधी जनतेला दिली होती.कित्तूर राजवाड्यातच किल्ल्याची प्रतिकृती उभारावी, या मागणीसाठी आज कलमठ मडिवाळ राजयोगिंद्र स्वामीजी आणि निच्चनकी मडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडत कित्तूर बंद पुकारण्यात आला होता.कित्तूर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते. कित्तूर राणी चन्नम्मा अभिमान्यांनी निच्चनकी येथील मडिवाळेश्वर मठ ते चन्नम्मा सर्कल असा निषेध मोर्चा काढून राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.. यावेळी माजी ग्रा.प.सदस्य बाबासाहेब पाटील व इतर नेते सहभागी झाले होते. यावेळी कित्तूरहून शेकडो वाहनांवरून चन्नम्मा अभिमान्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन निवेदन सादर केले आहे.

Tags: