कोरोना आणि पूरपरिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा झाला नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात देशभक्ती वाढविणारे व वेगळेपण दाखविणारे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, अशा सूचना खानापूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

खानापूर तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या स्वतंत्रदिनाच्या पूर्वतयारीसंदर्भातील बैठकीत त्या बोलत होत्या. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात देशभक्ती वाढविणारे व वेगळेपण दाखविणारे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, अशा सूचना खानापूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या आहेत.
यावेळी शिक्षक संघाचे बी एम एळ्ळूर यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात एनसीसी, स्काऊट गाईड सहभागी होणार असल्याचे सांगितले ,
दशरथ बनोशी यांनी स्वतंत्रदिनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचे सुचविले.
यावेळी तहसीलदार प्रवीण जैन बोलताना म्हणाले, , ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना यंदाच्या स्वातंत्र्यदिनी अमृत महोत्सवात राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील रुट लिस्ट अद्याप उपलब्ध नाही, मात्र नागरिकांनी घरोघरी ध्वज फडकवताना राष्ट्रध्वजाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जयंत तीणेकर यांनी अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या शाळा आणि सरकारी कार्यालयांसाठी अनुक्रमे २५००, १५०० आणि १००० रुपयांची वैयक्तिक बक्षिसे जाहीर केली. २६ जानेवारी रोजी या पारितोषिकांचे वितरण होणार आहे. खानापूर पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रकाश गाडीवड्डर आणि हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मार्शल आर्ट स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या विजेत्यांना आणि पत्रकारांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सन्मानित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी तहसीलदार प्रवीण जैन, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी, नगरपंचायत अध्यक्ष मजर खानापुरी, उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार, डीएचओ डॉ. संजय नांद्रे, आर एफ व प्रसन्न सुभेदार, मोशीन दरगावाले, विनायक वेरगलेकर, मेघा कुंदरगी आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments