Chikkodi

एकसंबा येथे रुग्णवाहिका लोकार्पणावरून गोंधळ

Share

स्थानिक नगरपंचायत सदस्यांना न बोलावताच खासदारांऐवजी त्यांच्या मुलाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केल्यावरून एकसंबा येथे नगरपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा मुलगा बसवप्रसाद जोल्ले यांनी एकसंबा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. यावेळी स्थानिक नगरपंचायत सदस्यांना बोलाविण्यात आले नाही, खासदारांऐवजी त्यांच्या मुलाने लोकार्पण करणे हे योग्य नाही, असा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकदंबा नगरपंचायतीच्या काँग्रेस सदस्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली होती.

या पत्रकार परिषदेत बोलताना नगरपंचायत सदस्य पोपट सप्तसागरे म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रादेशिक विकास निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरपंचायत सदस्यांना बोलाविण्याची साधी औपचारिकता देखील दाखवण्यात आली नाही. खासदारांच्या ऐवजी त्यांच्या मुलाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले, हि चुकीची बाब आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये याकडे लक्ष द्यावे, असा आग्रह या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

यावेळी नगरपंचायत सदस्य चिदानंद बेळ्ळी, उमेश सात्त्वर, विठ्ठल नाईक, किरण माळी, जमानशहा मकानदार, अरुण मगदूम, रवींद्र माने, पंकज पवार, विनोद चितळे आदींसह इतर उपस्थित होते.

Tags: