Chikkodi

तरुणांचे धाडस ! कारदग्यात मासेमारी करताना 6 फूट लांबीची मगर पकडली  

Share

ती बरोबर 6 फूट लांबीची मगर होती. या मगरीने गावकऱ्यांची झोप उडवली होती.गावातील तरुणांनी या मगरीला जिवंत पकडले आणि एका धाडसी कृत्याचे दर्शन घडविले. अखेर कुठे पकडली ती मगर? म्हणता, मग पाहा हा रिपोर्ट

6 फुटी मगरीला जिवंत खांद्यावर घेऊन फिरताना तरुण, मगरीला बघायला गर्दी केलेले लोक.. होय, निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावात एक दृश्य पाहायला मिळाले. काल, गुरुवारी संध्याकाळी बंडू गावडे नावाच्या तरुणाने कारदगा गावातील दूधगंगा नदीत जाळे टाकून मासे पकडले. त्याने एक मोठा मासा पकडला असे त्याला वाटले. मात्र ती मगर असल्याचे दिसून आले. त्यांने तातडीने धाडसाने मगरीला दोरीने बांधले, तर मच्छिमार बंडू गावडे, किसन मधाळे, सुशांत शिंगे, नागेश कांबळे, साताप्पा डांगे, नागेश कराळे, भावुसो गावडे, प्रदीप कुरणे, या युवकांनी हिंमत दाखवत मगरीला गावात ग्राम पंचायत कार्यालयासमोर आणले. मगरीला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. मासेमारी करताना मला एक मोठा मासा पकडल्याचे वाटले. वास्तवात ती  तर मगर होती. आम्ही सर्व मित्रांनी मिळून मगरीला जिवंत पकडले असे बंडू गावडे यांनी सांगितले. मगर पकडल्याने कारदगा येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच मगरीला पकडणाऱ्या तरुणांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.आता या मगरीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

आजच्या काळात मगरीचे साधे दर्शनही आपल्याला घाबरवण्यास पुरेसे असताना 6 फूट जिवंत मगरीला पकडणाऱ्या कारदगा गावातील तरुणाच्या धाडसाला हॅट्स अपच म्हणावे लागेल.

Tags: