अन्नपूर्णेश्वरी सिंचन प्रकल्प योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातील तलाव भरणीच्या पार्श्वभूमीवर आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते गावातील विविध नेत्यांच्या उपस्थितीत गंगापूजन पार पडले.

कृष्णा नदीच्या सिंचन योजनेतून वंचित असलेल्या हिरेकोडी, नेज, नागराळ तसेच आसपासच्या २३ गावातील जमिनींना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे ३१२१८ एकर जमिनीसाठी 139.५५ कोटी रुपये खर्चातून हि योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तलाव भारणीच्या पार्श्वभूमीवर आमदार गणेश हुक्केरी यांनी गंगा पूजन केले.
यावेळी बोलताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, तलाव, खंदक आणि ओसंडून वाहणाऱ्या नदीकाठी कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थना करणे हि आपली भारतीय संस्कृती आहे. मानवी जीवनाची संजीवनी असणाऱ्या तलावांचे गंगापूजन करून भविष्यात हे तलाव पाण्याने भरावेत, अशी प्रार्थना आपण करूया असे आमदार हुक्केरी म्हणाले. ()
यावेळी ग्रामस्थांनी आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या सिंचन योजनेबद्दल त्यांचे आभार मानले. () + ()
यावेळी अरुण बोने, राजू पाटील, प्रकाश मगदूम, संतोष हिरेमठ, मोहन शिंगाडे, डॉ. अण्णासाहेब मगदूम, रमेश पाटील, सुशांत बोने, अजितसिंग शितोळे, व्ही बी पाटील, परगौड पाटील, कुंदन कांबळे, बिदू हरगापुरे, अनिल शाम, श्रीशैल पाटील, बसगौडा मुद्दाई आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments