तुमकूर येथे आयोजित कर्नाटक राज्य शिक्षक प्रतिभा परिषद, म्हैसूर शैक्षणिक परिषदेत सीआरपी गणपती उप्पार यांना राज्यस्तरीय ‘शिक्षण सारथी‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


2018 मध्ये चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील मुडलगी झोनमधील कल्लोळी गट संसाधन व्यक्ती म्हणून काम करताना कल्लोळी सीआरपी केंद्र राज्यातील मॉडेल सेंटर बनविण्याचा गणपती उप्पार यांनी स्तुत्य प्रयत्न केलाय. सर्व शाळेतील गुरुवृंद समाज आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने सीआरपी केंद्राचा त्यांनी केलेला विकास राज्यात आदर्श म्हणून गौरवला गेलाय. उप्पार यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. त्यांच्या विशेष कामगिरीची दखल घेऊन कर्नाटक राज्य शिक्षक प्रतिभा परिषद – म्हैसूरचे राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद तुमकूर येथे आयोजित पुरस्कार समारंभात “शिक्षण सारथी” पुरस्काराने गणपती उप्पार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष शंभुलिंगगौडा पाटील, परिषदेचे राज्य अध्यक्ष पी महेश, संसाधन व्यक्ती रवींद्र, चित्रपट अभिनेते साईप्रकाश आणि मोगुरु सुरेश, सोसे मालिका फेम शैलू चित्रपट अभिनेत्री इला बिट्ला आणि चित्रपट क्षेत्रातील इतर कलाकार, राज्य शिक्षक प्रतिभा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments