Belagavi

कागवाड येथे एलएस ग्रुपच्या वतीने कोरोना योध्यांचा गौरव

Share

कोरोनाच्या काळात समाजसेवा करणारे डॉक्टर, पत्रकार, देशाच्या रक्षणात शहीद झालेल्या सैनिकांच्या माता, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा कागवाड येथे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या चाहत्यांनी स्थापन केलेल्या एलएस ग्रुपच्या वतीने गौरव करण्यात आला

शनिवारी संध्याकाळी कागवाड मल्लिकार्जुन विद्यालय सभागृहामध्ये, लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी आणि एपीएमसीचे संयोजक रवींद्र पुजारी यांनी कोरोना वॉरियर्सचा पुरस्कार देऊन सत्कार केला.

देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या 7 जवानांच्या मातांचा, त्याचप्रमाणे देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावून निवृत्त झालेले सैनिक, पोलिस कर्मचारी आणि आदर्श माता अशा 65 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावलेल्या चिक्कोडी, कागवाड आणि अथणी तालुक्यातील २६ पत्रकारांचा गौरव करण्यात आला. 11 डॉक्टर आणि 7 सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी भाजप युवा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र चिदानंद सवदी म्हणाले, यापूर्वी आमचे काही राजकीय विरोधक दावा करत होते की लक्ष्मण सवदी यांचे राजकारण संपले आहे, भाजपचे कट्टर कार्यकर्ते असलेल्या आणि पक्षाच्या उत्कर्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमच्या वडिलांची सेवा लक्षात घेऊन त्यांना घरातून बोलावून नेऊन राज्यातील सर्वोच्च उपमुख्यमंत्री पद देऊन राज्याची सेवा करण्याची संधी दिली. आता ते पुन्हा विधान परिषदेचे सदस्य झाले असून त्यांनी राज्याची सेवा सुरु केली आहे. त्यांच्या  नावाने सुरू झालेल्या एलएस ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी समाजाची चांगली सेवा सुरु ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.

एपीएमसीचे संचालक रवींद्र पुजारी म्हणाले की, लक्ष्मण सवदी हे माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वोत्तम राजकीय नेते आहेत. माझ्यासारख्या तरुणांनी त्यांच्या नावाने संस्था स्थापन करून अनुकरणीय काम केले आहे असे ते म्हणाले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एलएस ग्रुप अध्यक्ष बसवराज मगदूम, उपाध्यक्ष संजय करव, संचालक महावीर पाटील, महेशकुमार मडीवाळ, संजय पिरगण्णावर, राजू मगदूम, सचिन पाटील व इतर युवकांनी परिश्रम घेतले.

Tags: