मेंढ्यांच्या कळपात घुसून टिप्पर उलटल्याने पन्नासहून अधिक मेंढ्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. हा विचित्र अपघात हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी गावात आज सकाळी झाला.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील अम्मनगी गावातील मेंढपाळ हालप्पा सिद्दप्पा हेगडे यांच्या मालकीच्या कळपातील मेंढ्यांवर टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघातात पन्नासहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला. गावाच्या शिवारातून रस्त्याने मेंढ्यांचा कळप येत असताना टिप्पर वाहन चालकाचे नियंत्रण सुटून मेंढ्यांवर उलटला. त्यामुळे 50 हून अधिक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर घटनास्थळी पलटी झाल्यावर चालकाने टिप्पर वाहन सोडून पळ काढला.
अपघातस्थळी चिरडलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. त्यामुळे भीषण दृश्य निर्माण झाले होते. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी फरारी चालकाच्या शोधासाठी सापळा रचला आहे.


Recent Comments