हुक्केरी तालुक्यातील शिंदीहट्टी गावातील ऐश्वर्या मगदुम हिने मॉडेलिंग स्पर्धेत ‘मिस कर्नाटक‘ हा प्रथम क्रमांकाचा किताब पटकावल्याने ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून सत्कार केला.

एन. बी. मॉडेलिंग इन्स्टिट्यूट, बेंगळुरूने आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या कुमारी ऐश्वर्या मगदुम हिने ‘मिस कर्नाटक-2022’चे विजेतेपद पटकावले. ऐश्वर्या मंगलोरच्या श्रीनिवास विद्यापीठात एव्हिएशन मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.
तिच्या या यशाबद्दल शिंदीहट्टी कृषी पत सहकारी संघाचे अध्यक्ष गंगाधर गवती यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना गंगाधर गवती म्हणाले, ग्रामीण भागातील कुमारी ऐश्वर्या हिने ‘मिस कर्नाटक’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आमच्या गावची व बेळगाव जिल्ह्याची शान वाढवली आहे आगामी काळात तिला ‘मिस इंडिया’ ‘किताब मिळू दे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. बाईट
यावेळी शिंदीहट्टी कृषी पतसंस्थेचे अध्यक्ष गंगाधर गवती, उपाध्यक्ष बाळाप्पा शिवन्नागोळ, संचालक बसवराज जिनराळी, लगमप्पा मगदुम, तसेच गावचे नेते यल्लाप्पा खोत, शिवानंद मठपती, सुरेश शेरवी, गजानंद मगदुम, बाळेश गोकार आदी उपस्थित होते.


Recent Comments