हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर नगर येथील श्री दुरदुन्डेश्वर विद्यावर्धक संघाचे बसनगौडा पाटील यांनी वृध्दाश्रमाला भेट देऊन ब्लॅंकेटचे वितरण केले.

माजी मंत्री ए बी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी हुक्केरी परिसरातील वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण केले.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना बसनगौडा पाटील म्हणाले, माजी मंत्री ए बी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज वृद्धाश्रमांना भेट देण्यात आली. तेथील वृद्धांसमवेत काही वेळ घालवून, त्यांना ब्लॅंकेट, फळे, यासह जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. 
यावेळी अनिल पाटील, काडाप्पा तोरपाटी, संतोष पाटील आदी उपस्थित होते,


Recent Comments