अभिनेता आणि उद्योगपती शिवरंजन बोळेन्नावर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री बैलहोंगल येथे घडली. बैलहोंगल तालुक्यातील लोक, वडीलधारी मंडळी, चाहते आणि हितचिंतक यांच्या आशीर्वादानेच मी गोळीबाराच्या हल्ल्यातून वाचलो असे त्यांनी सांगितले.

आपल्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती अभिनेता आणि उद्योगपती शिवरंजन बोळेन्नावर यांनी आज, बुधवारी सकाळी पत्रकारांना दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, डीवायएसपी शिवानंद कटगी, सीपीआय यू. एच. सातेनहळ्ळीसह जिल्हा व शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तपास सुरु केला. यावेळी त्यांनी बोलणे सुरू ठेवत माझ्या भावाच्या नातेवाईकांनीच गोळ्या झाडून आपल्या हत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. देव आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे आपण बचावल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments