Khanapur

खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच; मुडेवाडी शाळेची इमारत कोसळली

Share

खानापूर तालुक्यात कालपासून पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. पण पावसाची रिपरिप सुरूच आहे. पण जुन्या शाळांच्या खोल्या एक एक करून कोसळू लागल्या आहेत. तालुक्यात मुडेवाडी शाळेची इमारत कोसळली.

होय, खानापूर तालुक्यात वरुणराजाचा प्रकोप काल पासून काही प्रमाणात कमी झाला आहे. पण पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्याबरोबरच एकामागून एक जुन्या शाळांच्या खोल्या कोसळू लागल्या आहेत. नुकतीच  गर्लगुंजी शाळेच्या जुन्या खोलीची भिंत कोसळली, तर काल रात्री मुडेवाडी गावच्या शासकीय कनिष्ठ प्राथमिक शाळेची भिंतही कोसळली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार खानापुरामध्ये 15.8 मिलीमीटर, नागरगाळीत 33.8 मिमी, बिडीमध्ये 6.6 मिमी, असोगा येथे 19.6 मिमी, कक्केरीमध्ये 11.2 मिमी, लोंढा येथे 79 मिमी, लोंढा पीडब्ल्यूडी परिसरामध्ये 65.8 मिमी तर जांबोटी परिसरामध्ये 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कनकुंबी परिसरामध्ये सर्वाधिक 91.8 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. कालपासून मोठा पाऊस नसला तरी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.

Tags: