Hukkeri

हुबळीत केंद्र सरकारच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

Share

हुबळीधारवाड महानगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी धारवाड जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथे जीवनावश्यक वस्तू गॅस दरवाढीच्या शासनाच्या धोरणाच्या  निषेधार्थ आज निदर्शने करण्यात आली.

शासनाच्या दरवाढीच्या धोरणाविरोधात हुबळी-धारवाड महानगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटी व धारवाड जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार आहे, जनता भाजप सरकारला कंटाळली असून, दैनंदिन वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ लवकर थांबवावी, अशी मागणी करत केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी आंदोलन केले.या आंदोलनात काँग्रेस नेते नगरसेवक इम्रान एलिगार, स्वाती मळगी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: