Hukkeri

शेतकऱ्यांनी 30 जुलैपूर्वी पीक विमा काढावा : वनमंत्री उमेश कत्ती 

Share

कृषी विभागाने शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी विविध योजना राबविल्या असून त्यांचा शेतकऱ्यांनी चांगला उपयोग घेतला पाहिजे असे अन्न वनमंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले.

हुक्केरी शहरातील कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात कृषी विभागाने आयोजित केलेल्या समग्र कृषी अभियान माहिती व पीक नुकसान जीवन विमा रथाला मंत्री उमेश कत्ती यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, हुक्केरी तालुक्यात मान्सूनच्या पावसाने जमीन मऊ झाली आहे. पेरणीचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घ्यावीत.तालुक्यात मोठ्या प्रमाणात बियाणे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोबाईल ऍपद्वारे माहिती देण्याचे काम सुरू आहे. कृषी खात्याने शेतकरीपुरक कार्यक्रम आखले पाहिजेत. कृषी अभियानाचा रथ प्रत्येक गावात फिरून शेतकऱ्यांना कृषी खात्याची आणि पीक विम्याची सर्वंकष माहिती देणार आहे. शेतकऱ्यांनी ३० जुलैपर्यंत पीक विमा काढावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, सहायक कृषी संचालक महादेव पटगुंदी, तापं मुख्याधिकारी उमेश सिदनाळ, हुक्केरी नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, परगौडा पाटील आदी उपस्थित होते.

Tags: