Khanapur

खानापूर रेल्वे स्थानकात अस्वच्छता, डुकरांचा संचार  : KHANAPUR RAILWAY STATION HEAVEN FOR PIGS

Share

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खानापूर रेल्वे स्थानक गैरसोयींचे ठिकाण बनले आहे. येथे सर्वत्र डुकरे मोकाट फिरत आहेत. त्यामुळे जनता अधिकाऱ्यांना शिव्याशाप देत आहे.

होय खानापूर रेल्वे स्थानक विविध गैरसोयींचे आगर बनले आहे. ज्या ठिकाणी लोकांना यावे-जावे लागते त्या सर्व ठिकाणी डुकरांचा मोकाट संचार हे सामान्य दृश्य बनले आहे. येथील अनागोंदीकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने जणू आम्हाला कोण जाब विचारणार, असा प्रश्न करत डुकरे सर्वत्र आरामात फिरत आहेत.

केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले असूनही , स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत. सकाळी-सकाळी वायूविहारासह कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना ही रेल्वे स्थानकातील ही अस्वच्छता, डुकरांचा संचार त्रासदायक ठरत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्थानकातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी  व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

 

Tags: